चित्रपट फ्लॉप झाल्याने Shah Rukh Khan ला वितरकांना पैसे परत करावे लागले | Lokmat News

2021-09-13 61

शाहरुख खान जरी बॉलिवूड चा किंग असला तरी त्याचे बरेचसे चित्रपट फ्लॉप होत असल्याने त्याला चित्रपटा च्या वितरकांना पैसे परत करावे लागत आहेत. या वर्षी शाहरुखचा प्रदर्शित झालेला ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर आपटल्याने त्याला या चित्रपटाच्या वितरकांनाही पैसे परत करावे लागले आहेत.
इम्तियाज अलीने दिग्दर्शन केलेल्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानने केली होती. हा चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच शाहरुखने प्री सेलमधून बंपर कमाई केली होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. 100 कोटीच्या घरात कमाई करण्याची अपेक्षा असलेल्या या चित्रपटाने अवघे 64.33 कोटी कमावले होते. त्यामुळे वितरकांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. अखेर वितरकांनी शाहरुखला नुकसान भरपाई देण्यास सांगितले.या चित्रपटा च्या प्रदर्शनाचे हक्क एनएच स्टुडिओने 80 कोटी रुपयांना घेतले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 64.33 कोटी कमावले. त्यामुळे शाहरुखला एनएच स्टुडिओला 15 टक्के रक्कम परत करावी लागली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires